कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार उद्योजक आणि फुटबॉलपटू चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री हैदराबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी एक पर्यंत कोल्हापुरात पोहोचणार असून दोन वाजेपर्यंत काँग्रेस समितीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरकरांना जोरदार धक्का बसला आहे.
त्यानंतर काशीद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. आमदारांचे पार्थिव सध्या सोलापूर इथपर्यंत असून तेथून ते कोल्हापुरात एकच्या सुमारास येईल. आमदार जाधव यांच्या निधनाची बातमी एकूण धक्का बसला आहे. साधे आणि सर्वात मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व होते, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळशी बोलताना दिली. कोविड नंतर त्यांच्या अन्ननलिके आणि हृदयाकडी ल रक्त वाहिनी ला इन्फेक्शन झाले होते.
काही महिन्यापूर्वी मुंबईत छोटी शस्त्रक्रिया ही झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पुढील शस्त्रक्रियेसाठी आठवड्याभरापूर्वी त्यांना हैदराबादमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मात्र पुन्हा इन्फेक्शन झाल्याने दोन दिवसापूर्वी आणखी छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.