मुंबई | आपल्यविधानामुळे आणि कवितांमुळे प्रसिद्ध असलेले केंद्रीय रायमात्र रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गाताना अनेकवेळा दिसून आले आहेत तसेच राज्याच्या राजकारणावर सुद्धा त भाष्य करत असतानां आता पुन्हा त्यांनी राज्याच्या राजकारणावर आणि महाविकास आघाडी सरकारच्या भविष्यावर भाष्य केले अहे.आज तरी महाविकास आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं चित्र आहे. कारण भाजप आणि शिवसेना एकत्र आले किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत गेली तरच राज्यात सत्ता बदल होऊ शकतो, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते लोकमत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना बोलत होते.
आमदार फुटण्याची किंवा फोडण्याची स्थिती आज तरी मला दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. तसेच आठवलेंना यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडवणीस हे दोघेच देऊ शकतील, असं आठवलेंनी म्हटलं अहे. पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत, पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाला निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा दावाही रामदास आठवलेंनी केला आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये पुरेसे बहुमत मिळाले नाही, तर ते अकाली दलाच्या सोबत जातील. दोघे मिळून सरकार बनवू शकतील. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसेल, असंही आठवलेंनी म्हटलंय.