मुंबई : जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरूवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते असा आरोप लगावला होता.
या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषेद घेऊन सर्व आरोप फेटले होते. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या दोन्ही मुलींची शपथ घेतली होती. मात्र आता या आरोपांवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.
“निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेयांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर विचार करायला लावणारा आहे. पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावं” अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता लवकरच परब यांच्या अडचणी वाढणार असे संकेत फडणवीसांनी दिले आहे.