मुंबई | खासदार छत्रपती संभाजीराजे आज पासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, आज आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये आज आझाद मैदानावर मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो, मात्र अनेकजण आले आहेत. मला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या घराण्याला पाठिंबा आहे. माझा लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी माझा लढा असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले.
आजपासून संभाजी राजेंचे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत ही वेळ यायला हवी नव्हती परंतू, सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी रहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमरण उपोषण सुरू करण्यापूर्वी संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर प्रसारमाध्यमंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मी 2007 पासून महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे याची जाणीवजागृती केली पाहिजे असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या बारा बलुतेदारांना सोबत घेऊन पुढे गेले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषण करावे लागत असल्याचे संभाजीराजे म्हणाले.