पुणे | ज्या महापालिकेच्या पायरीवर भाजप नेते किरीट सोमय्या पडले. त्याच पायरीवर सोमय्या यांचा शुक्रवारी सत्कार करण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. मात्र, पुणे महापालिकेने परवानगी नाकारल्याने भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. भाजप नगरसेवक आणि कार्यकर्ते पालिकेच्या पायरीवर मोठ्या संख्येने जमले. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. तेवढ्यात सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस त्यांना पालिकेत घेऊन गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद’, ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी झालेल्या कार्यक्रमादरम्यान भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांना अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं बापट म्हणालेत.
काँग्रेसवाले गोमुत्र घेऊन गेलेत. तपासायला पाहिजे. कदाचित वाईन असेल. त्याचा वास इथपर्यंत येतोय. मी फक्त वासावर आहे, पित नाही कधी. त्यामुळे मी किरीट सोमय्या यांचे आभार मानतो, असं ते म्हणाले. संजय राऊतपासून अनेक जण म्हणत असतील या किरीट बाबाला तुम्ही यूपीत का नाही पाठवलं? पण अनेक अखिलेश इथं देखील आहेत. त्यांची वाट लावण्याचं काम सोमय्या करत आहेत, असंही गिरीश बापट यांनी म्हटलंय.