मुंबई | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर सोमय्यांना कसबसं सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर काढलं. धक्काबुक्कीमध्ये ते महापालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान आज यांनी डिस्चार्ज मिळाल्याचे ट्विट करत मोठा दावा केला आहे.
पुणे महानगरपालिका आवारात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आताच्या केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, ‘पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह 8 शिवसेना नेत्यांना अटक होणार आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमं लावण्यात आली याची देखील सोमय्या यांनी माहिती दिली आहे.
‘मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. एफआयआर क्रमांक – IPC कलम 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504, 37(1), 135’ असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांनी एफआयआरची कॉपी देखील पोस्ट केली आहे.