नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे अनेक वेळा कौतुक केले. दरम्यान, कोरोनाबाबत बोलताना मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसे असते तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताईमाझ्यापेक्षा सिनिअर आहेत. मी त्यांचा आदर करते; पण त्यांनी मोदींच्या भाषणाबाबत हैराण होण्याची गरज नाही.
पुढे त्या म्हणाले की, शरद पवार यांच्या कामाबाबत शंका नाही, जिथे राज्याचे मुख्यमंत्री घरात बसतात तिथे या वयातही शरद पवार साहेब काम करतात. त्यांचे मोदींनी कौतुक केले यात काहीही चूक नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. सकाळीच संजय राऊतांनी जे सूचक विधान केले त्यावर राणा यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणतात, ‘मी सगळ्यांच्या बोलण्याबाबत ठेका घेतला नाही’ पण महाविकास आघाडीमधील नातं तुटत चाललं आहे. सध्या महाविकास आघाडीमधील कड्या ठिसूळ होत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही.