पुणे | गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिद, मदरशावर धाडी टाका आणि मशिदीवरील भोंगे काढा, असे वक्तव्य केले होते .राज ठाकरे यांच्या विधानानंतर मनसेच्या मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं आहे.
इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आहेत. शेख यांनी मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. १६ वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. या भावनिक पोस्ट विषयी शेख यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागलाय, पक्षाचे नेमकी भूमिका काय आहे?पक्षात नेमके चालंलय काय?
२००९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर २०१९ साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मुस्लिम मतदान झाले आहे. आत्ता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे असे शेख यांनी सांगितले.