मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ह्रता दुर्गुळे व टीव्ही दिग्दर्शक प्रतीक शहाने अखेर काल लग्नगाठ बांधली.कला विश्वातील आघाडीची अभिनेत्री ह्रता गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी जीवनामुळे चांगलीच चर्चेत आली होती. ह्रता व प्रतीकने बुधवारी मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली.
या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटोस अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. ह्रताने फोटो शेअर करताच चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही ह्रता व प्रतीकला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ह्रता आणि प्रतीक दोघेही पारंपारिक वेशात एकमेकांना साजेसे दिसत आहेत.
ह्रताने तिच्या लग्नात पिवळी व लाल काठांची कांचीपुरम साडी परिधान केली होती तर प्रतीकही ऑफ व्हाईट शेरवानीत शोभून दिसत होता.
कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ह्रता व प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षी 24 डिसेंबरला ह्रता व प्रतीकने साखरपुडा केला होता. त्यानंतर गुपचुप लग्न करत ह्रता व प्रतीकने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.