कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजी राजेंनी आज आंदोलनाची हाक दिली असून आज या आंदोलनाला सुरवात झालेली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा सहभागी झाले आहेत तसेच खासदार धैर्यशील माने हे या आंदोलनात सालायन लावून आजारी असताना सुद्धा सामील झाले होते.
संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.
न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे..एका बाजीला जनरेटा तयार होतोय, ४८ खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे असे विधान खासदार माने यांनी केली आहे.