पुणे : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी टीका केली. यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यावर हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते,’ असे सावंत यांनी म्हणत आहे.
आघाडी सरकारवर भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना आज पुणे येथे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंत म्हणाले, ‘ मराठा आरक्षणाच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली ती सेव्ह मेरीट या नावाच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेली होती. या संघटनेचा मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात आले कि, या संघटनेचे नागपूर कनेक्शन आहे. विशेष म्हणजे हे पदाधिकारी भाजपचेच आहेत. ज्या मराठा आरक्षणाबाबत भाजपकडून बोललं जातंय त्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते.
यावेळी सावंत यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘ मराठा आरक्षणाबाबत मोर्चा काढणार असल्याचा इशारा देणारे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला आहे. त्यांच्याकडूनच मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून ते या समाजातील लिखाण फसवण्याचे काम करीत आहे.’