मुंबई। दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केले असून त्यांना ३ मार्चपर्यंत सत्र न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावणी आहे.या पार्श्वभूमीवर महाविकाआघाडीचे सर्व नेते मंडळी आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकार तपास यंत्रणेनेचा करत असलेला चुकूच्या वापराविरोधात शांतपणे आंदोलन करणार आहे. ईडीने मलिकांना ८ तासांच्या चौकशीनंतर अटक केली.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओके त्यांच्या निवासस्थान बैठक बोलावण्यात आली होती. या दोन्ही बैठकीनंतर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करून महाविकासआघाडीची ताकद दाखवणार आहे.दरम्यान, मलिकांनी “झुकेंगे नही, और लढेंगें,” अशी प्रतिक्रिया ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मलिक यांच्या समर्थनात उतरले आहे. “मलिकांवर लावलेले आरोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही. तर मग त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,” असे म्हणत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मलिकांचा राजीनाम्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला आहे. मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही. मलिकांच्या राजीनाम्याचा आसुरी आनंद घेऊ देणार नाही. मलिकांची अटक ही दुर्दैवी बाब आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.