कलर्स महारथी वाहिनीवर सध्या नव्याने सुरु झालेल्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली असून कायक्रमाच्या दुसऱ्या दिवसापासून घरच्या सदस्यांमध्ये भांडं सुरु झाली आहेत तर दुसरीकडे आणखी एका करणामुळे यंदाचे बिगबॉस चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे. अभनेता या कार्यक्रमाला होस्ट करत असून या कार्य्रक्रमात त्यांच्या लूकची एका राजकीय पुढाऱ्यासोबत तुलना केली जात आहे.
नुकताच बिग बॉसच्या सिजनमध्ये अभिनेता महेश मांजरेकर यांचा लुक पाहून नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांची तुलना ही राष्ट्रवादीचे नेते आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.एका व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावल्याचे दिसत आहे. त्यावेळी महेश मांजरेकरचा लुक पाहून त्यांना सोशल मिडीयावर ट्रोल केले आहे.
दरम्यान, सोशल मिडीयावर अनेक नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘मला वाटलं भुजबळच आहे की काय’, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय,’ ‘Same to same छगन भुजबळ साहेब,’ ‘आम्ही तर भुजबळ साहेबांना बघायला आलो,’ अशा कमेंट सोशल मिडीयावर पाहायला मिळाल्या होत्या.