कर्नाटक | कर्नाटक आपली एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही . उलट महाराष्ट्रात असलेले अनेक कन्नड भाषिक भाग कर्नाटकात समाविष्ट करून घेण्याचा विचार सुरू आहे , अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी ‘ कानडी ‘ फूत्कार सोडले . सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका स्पष्ट आहे . काही झाले तरी आम्ही झुकणार नाही , अशी हटवादी भूमिकाही त्यांनी मांडली .
कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहणाऱया मराठी भाषिकांच्या लढय़ाला आपला पाठिंबा राहील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केलेत्यांच्या विधानावर पलटवार करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रविरोधी द्वेष जाहीर केला. महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाषेची नौटंकी किंवा सीमाप्रश्नाचा वापर करू नये. महाराष्ट्रात सध्या राजकीय संकट आहे. त्यांचे संपूर्ण सरकार दडपणाखाली आहे.
म्हणून महाराष्ट्राचे नेते भाषा आणि सीमावादाचा मुद्दा उपस्थित करताहेत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते असे करताहेत, असा अजब तर्क बोम्मई यांनी सोमवारी बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना लावला. सीमाप्रश्नावर कर्नाटकची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.