पुणे : राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना लसीकरण मोहिम युद्ध पातळीवर उरू करण्यात यावी असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्यात पुण्यात बनत असलेल्या कोविशील्ड लसीकडे संपूर्ण जभराचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुनावाला यांनी लसींसंदर्भात महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी भाजप काय काय उपाययोजना करत आहे, यासंदर्भातील माहिती पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यांनी कशापद्धतीने भाजप नगरसेवकांकडून रुग्णालयांमध्ये बेड्सची सुविधा पुरवली जात आहे, याबद्दलची माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत सीरम संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले आहे.
पत्रकार परिषदेनंतर सीरम संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी, याबद्दल बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही. सीरम यासंदर्भातील उत्तर देऊ शकेल, असे सांगितले. त्यांना पुढे पत्रकारांनी सीरम महाराष्ट्रात आहे आणि पुनावाला कुटुंबाकडे त्याचा कारभार असल्याचे विचारले असता, मी पुनावाला यांना एवढेच आवाहन करु शकतो की त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यामधील रुग्णालयांच्या बेड्सची संख्या वाढवण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.