मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा करण्यात आला होता. अखेर तो स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली होती. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं होतं.यावेळी त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आल्याच म्हटलं होतं . पण भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येत येण्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी उत्तर भारतीयांचा “अपमानित” केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
जोपर्यंत राज ठाकरे जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेशात जाऊ देणार नाही, असे भाजप खासदाराने म्हटले होते. मात्र, अयोध्या यात्रा पुढे ढकलण्यामागील कारणांची माहिती राज ठाकरेंनी दिलेली नाही. राज ठाकरेंच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, शिवसेनेने याबाबत अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ते 22 मे रोजी पुण्यात रॅली घेणार आहेत आणि यावेळी ते त्यांच्या अयोध्या दौऱ्याशी संबंधित माहिती देणार आहेत. याआधी एप्रिलमध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा ‘अल्टीमेटम’ दिला होता, त्यानंतर त्यांना धमकीचे पत्र आले होते.