लखनऊ : अनेक प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले निलंबित आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी घराबाहेर लावलेल्या बोर्डाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमिताभ ठाकुर हे लखनऊच्या गोमती नगरमध्ये वास्तव्याला आहे. या घराबाहेर त्यांनी स्वत:च्या नावाखाली पद आणि ‘जबरिया रिटार्ड’ अशी उपाधी स्वतः लावून घेतली आहे. त्यांचे हे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने जबरदस्तीने दोन आयपीएस अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवले आहे त्यात ठाकूर यांचे सुद्धा नाव होते .केंद्राने परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे पाऊल उचलले. जनहितार्थ या दोन्ही अधिकाऱ्यांना निवृत्त करण्यात आल्याचे कारण योगी सरकारने दिले.
त्यांच्यावर नियमांचे पालन न करणे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचेही योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र ठाकूर यांनी करण्यात आलेल्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. तसेच करण्यात आलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे.