“उत्तर प्रदेश हे संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण करणारं राज्यही बनलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला यूपी सरकारनं चांगल्या पद्धतीनं हाताळत आहेत, ज्या आजारांवर उपचार मिळवण्यासाठी कधी दिल्ली आणि मुंबईला जावं लागत होतं ते उपचार आज काशीत उपलब्ध आहेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी सरकारचे तोंदभरून कौतुक केले आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी टोला लगावला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
तसेच लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही,” असं देखील प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.