मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सरकार लवकरच कोसळेल असे विधान विरोधक करत असताना आता रास्तवराडीचे अद्यक्ष शरद पवार यांनी आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असे विधान केले होते याच वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावला आहे.
‘महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’ असं ट्वीट करुन भातखळकरांनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली आहे.
पवार म्हणाले की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभे आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले