मुंबई | माझ्यावर पाळक ठेवली जात आहे तसेच आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला होता. आता पटोले यांनी लावलेल्या आरोपांना राष्ट्र्वादीने सुद्धा सडेतोड उत्तर दिले आहे.
नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेऊन आरोप करावे, असं नवाब मलिक म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, कोणतही सरकार सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष ठेवत असते. हे आताच होतंय असं नाही. सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यासाठी हे प्रत्येक सरकारमध्ये होतं. नाना पटोले यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती घ्यावी, अस नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.