मुंबईतून सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सकाळपासून मुंबईत एनआयएची छापेमारी सुरु आहे.एनआयएच्या छापेमारीत अनेकांना अटक करण्यात आलं. त्याचबरोबर अनेक बड्या नेत्यांची नावे समोर आली आहेत.एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधीत, संशयीत मालमत्तांवर कारवाईचा सपाटा सुरु आहे.
या कारवाईत मंत्री नवाब मलिक यांचंही नाव समोर आल्यांच समजतंय. त्यामुळे राज्यात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.सकाळपासून सुरु असलेल्या या कारवाईवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. नवाब मलिक यांच्या चौकशीतूनच एनआएने या पुढील कारवाया झाल्या आहेत.
पुढे बोलताना लढा म्हणाले की, एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांची चौकशी होणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणाकोणाचं नाव समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.