पश्चिम बंगाल | अफगाणिस्तान तालिबानने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतले आहे. काही देशांनी तालिबानच्या या वागणुकीचा निषेध व्यक्त केला आहे. तालिबानच्या या कृतीचे जसे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले आहेत, तसेच भारताच्या अंतर्गत राजकारणामध्येही यामुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची तुलना तेथील भाजप नेते सातत्याने तालिबानी कारवाईशी करत आहेत.
यातच, पश्चिम बंगालमधील भाजपच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. भाजपचे बंगाल राज्याचे महासचिव सयांतन बसू यांनी ‘लेडी तालिबान पाहायचं असेल, तर कालीघाटमध्ये या’ अशा शब्दांमध्ये ममतांवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दोन भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती, याबाबत बोलताना त्यांनी तृणमूलवर बरेच आरोप केले होते.
ते म्हणाले, की “तूणमूल सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांच्या सर्व अधिकारांवर गदा आणली जात आहे. बंगालमध्येही तालिबानी शासनच सुरू आहे. जर कोणाला तालिबान पहायचं असेल, तर काबुलला जाण्याची गरज नाही अशी टीका त्यांनी केली होती.