नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे स्पष्ट आहे की कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व रूपे कशी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. तर वयोगटानुसार सर्व पात्र बालकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच आपल्याला पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 2,927 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,204 प्रकरणे एकट्या राजधानी दिल्लीतील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरातून 2252 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील कोरोनासंदर्भात आमची ही 24 वी बैठक आहे. कोरोनाच्या काळात केंद्र आणि राज्यांनी ज्या प्रकारे एकत्र काम केले आणि ज्यांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मी सर्व कोरोना योद्ध्यांचे कौतुक करतो. गेल्या 2 आठवड्यांपासून वाढत्या कोरोना बाधीतांच्या संख्येमुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. आरोग्याच्या पायाभूत सुविधांपासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत कोरोनाशी संबंधित प्रत्येक बाबीमध्ये आवश्यक ते उपलब्ध करून देण्याचे काम देशाने 2 वर्षात केले आहे.