केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीचे प्रकरण चांगलेच पेटले आहे.राष्ट्रवादीच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका बाजूनं गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
दुसरीकडं पुण्यातील काल झालेल्या राड्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे. पुण्यात महाविकास आघाडीची मोगलाई सुरू झालीये अशी टीकाही मुळीक यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी महिलांवर हात उगारणं ही त्यांची संस्कृती आहे. अशी टीका केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या गाडीवर धावताना ,शाई फेकताना अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती असा खोचक प्रश्न विचार रुपाली पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या कार्यक्रमात येऊन राडा घालताता ही आहे का तुमची संस्कृती? राष्ट्रवादी काँग्रेसचं संस्कृती बिघडवण्याचं काम करतीये असे म्हणत आमदार रोहित पवारांच्या टीकेलाही जगदीश मुळीकांनी उत्तर दिले आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला प्रकार निंदनीय असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालिश पद्धतीची वक्तव्य करतात , असा टोलाही त्यांची प्रशांत जगताप यांचं नाव घेता लगावला आहे .