उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या बेधडकपणा आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. आरोग्याची काळजी घेण्याबाबत देखील ते नेहमीच सल्ले देत असतात. मास्क वापरण्याबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या अजित दादांनी आता व्यायाम कसा करावा याचा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की, मैदानी खेळांनी शरीर चांगलं राहतं. गेले दोन वर्षे कोरोनामुळे व्यायाम करता आला नाही, कसाही व्यायाम करून चालत नाही, अति व्यायाम देखील वर घेऊन जातो. त्यामुळे ट्रेनरच्या मदतीनं व्यायाम करा, असं ते म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना ते म्हणाले की, आता परत कोरोना वाढतोय. इथं पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे. स्टेजवर फक्त एक जणांनी मास्क घातला आहे बाकी कोणीच घातला नाही,सगळे सांगतात मास्क घाला,मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय,परत कोरोना येतोय,अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही.
आज कोरोनाची टेस्टिंग कमी आहे. सर्वांनी लस घ्यावी, बुस्टर डोस घ्यावा. राज ठाकरे, सोनिया गांधी यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांचं ऑपरेशन होत त्यावेळी त्यांना कळलं. कोरोना गेला नाही काळजी घ्यायला हवी, तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, रस्त्यावर कचरा टाकण्यावरुन बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणेकर, मुंढवाकर रस्त्यावर कचरा कशाला टाकता. स्वतःच घर साफ अन् बाहेर कचरा. यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका. कारण कचऱ्यामुळे घाण होते अन् रोगराई वाढते असं ते म्हणाले.