रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्या कारमध्ये जिलेटीनच्या २० कांड्या सापडल्या होत्या. आता या कृत्याची जबाबदारी ‘जैश उल हिंद’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. तसेच या संघटनेने दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.
ज्या भावाने अंबानींच्या घराबाहेर गाडी लावली, तरी सुखरुप घरी परतला आहे. थांबवू शकत असाल, तर थांबवण्याचा प्रयत्न करा. हा फक्त ट्रेलर होता, अजून मोठा पिक्चर बाकी आहे. जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत लक्ष्य केले, तेव्हा तुम्ही काही करु शकला नव्हता.
तसेच तुम्ही मोसादसोबत (इस्रायली गुप्तचर संघटना) हातमिळवणी केली, पण काही झाले नाही. तुम्हाला माहित आहे, की काय करायचं आहे असे अबनीला उद्देशून म्हंटले आहे. तुम्हाला आधी सांगितले आहे, त्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर करा, असा मेसेज टेलिग्राम अॅपवर लिहिण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचा पोलीस आणि गुप्तचर संघटना कसून तपास करत आहे.