उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळवून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपारी वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. तसेच या बंदला यश्वशी करण्यासाठी व्यापारी वर्गाने मदत करण्याचे आव्हान आघाडी सरकारकडून करण्यात आले आहे. तर या बंदलास काही तुरळक व्यापारी वर्गाने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
लखीमपूर येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र तरी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच पुणे आणि नागपुरमधील काही व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला नाही. याबाबत विचारल्यानंतर केवळ बोटावर मोजण्या एवढ्या भाजप व्यापारी संघटनांंचा महाराष्ट्र बंदला विरोध असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.केवळ-बोटावर-मोजण्या-एवढ्लखीमपूर येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र तरी आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ केली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच पुणे आणि नागपुरमधील काही व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला नाही. याबाबत विचारल्यानंतर केवळ बोटावर मोजण्या एवढ्या भाजप व्यापारी संघटनांंचा महाराष्ट्र बंदला विरोध असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर पुणे शहरात जागोजागी जाऊन कार्यकर्त्यांनी सर्व सेवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. तर कार्यकर्त्यांकडून पीएमपीएल डेपोवर जाऊन बंदचे आवाहन करण्यात आले होते. तसेच पुण्यातील रस्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा या बंदला पाठींबा आहे. या पक्षांच्या प्रतिनिधींनी 9 तारखेला पत्रकार परिषद घेऊन तशी माहिती दिली होती.