मुंबई | आता पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून सुरु असलेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भारतीय जनता पक्षाला जोरदार टोला लगावला आहेः.शिवसेनेच्या अग्रहलकेहत लिहिले आहे की, भाजपचा जन्म काही पवित्र झग्यातून झालेला नाही. त्यांचेही पाय मातीतच आहेत. त्यामुळे सत्तेची तागडी वर-खाली होत असते हे त्यांच्या प्रमुख लोकांनी विसरू नये. केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून पक्षाने धुमाकुळ घातला आहे. त्यातीत एक-एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे. तर आर्यन खान आणि रिया चक्रवर्तीच्या प्रकरणावरूनही एनसीबीवर निशाणा साधण्यात आला आहे.
पुढे अग्रलेखात लिहिले आहे की ४ हजारांच्या अंमली पदार्थांची चौकशी हे एनसीबीचे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी पथक आहे. मुंबई पोलिस अधूनमधून कोट्यवधी रूपयांचा माल पकडतात आणि नष्टही करतात, पण ते प्रसिद्धीसाठी उद्योग करत नाहीत, अशी खोचक टीकाही सामनातून करण्यात आली आहे. आपल्या कारवाया वादग्रस्त का ठरत आहेत? याचा शोध ज्याने त्याने घ्यायला हवा, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.
खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खान प्रकरणातही वसुली करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधी सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील, असा रोखठोक इशारा सामनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. लोकशाहीत मालक बदलत असतात हे भाजप व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी हे पक्के लक्षात घेतले पाहिजे, असा खोचक सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.