मुंबई | राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटलेले दिसून येत असून शाब्दिक चकमक चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच या कटाचे सूत्रधार भाजप नेते किरीट सोमय्या असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता.
मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आता या वादात उडी घेतली असून सामनावीर यांनी जो हिशोब ईडीला द्यायचाय त्याची चिंता करावी, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी केली आहे. राऊतांच्या या विधानानंतर मद्यमांशी संवाद साधताना ही टीका देशपांडे यांनी केली आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजप कट रचतंय, असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना प्रतित्त्युर दिलं आहे. विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब “इ.डी” द्यायचाय त्याची चिंता करावी, राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोण्याच्या बापात नाही, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.