शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ८ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानी यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे करत गंभीर आरोप केले होते. यासंदर्भातच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे, असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.
“ठाकरे सरकार स्पष्ट करू शकते का, जितेंद्र नवलानी प्रकरणाची स्थिती काय आहे? तपास कोण करत आहे? ईओडब्ल्यू की एसीबी पोलीस मुंबई? EOW मुंबई पोलिसांच्या SIT विशेष तपास पथकाचे काय झाले? एसीबीची प्राथमिक चौकशी किती दिवसांत झाली? तसेच ही चौकशी EOW की ACB द्वारे झाली?”, असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत केले आहेत.
जितेंद्र नवलानी आणि किरीट सोमय्या यांचा काय संबंध?
जितेंद्र नवलानी यांच्या सात कंपन्यामध्ये करोडो रूपये ट्रान्सपर केले जातात. है सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सपर केले जातात. मात्र याच्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? सोमय्यांनी हे स्पष्ट करावं. असे आव्हान त्यावेळी संजय राऊत यांनी दिले होते. मात्र हे सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले होते.