काल रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मंत्रालयासमोर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा शिवगड बंगला आहे. रात्री एक महिला आव्हाड यांच्या शिवगड बंगल्यासमोर आली आणि तिने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
तृप्ती निवृत्ती कांबळे असे या महिलेचे नाव आहे. बंगल्यासमोर असलेल्या फुटपाथवर या महिलेनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी धावत जाऊन महिलेल्या हातातून पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली आणि त्या महिलेला ताब्यात घेतले.
वरळी येथील बीडीडी चाळीत सध्या तिथं क्वाटर्समध्ये राहत असलेल्या पोलिसांना ५० लाख रूपयांना घरे दिली जातील.
२२५० पोलीस कुटुंबीय तिथं राहत असून माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार करण्यात आला आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या बीडीडी चाळीत पोलिसांना ५०० चौरस फुटांची घरे दिली जातील. ज्याचा वरळीत बांधकाम खर्च १ कोटी ५ लाख इतका आहे. त्यामुळे फुकटात अजिबात घरे दिली जाणार नाहीत. गिरणी कामगार आणि पोलीस यांची तुलना होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.