देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्राच्या अडचणीत अधिक भर घालताना दिसत आहे. आज देशात उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवा सुद्धा कोरोनाच्या संकटात अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान राष्ट्राने मदतीचा हात पुढे केला आहे. या संदर्भात एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक फैजल एधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाउंडेशनने भारताला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी संस्थेचं सर्व स्थरातून कौतुक होताना दिसत आहे. आज संपूर्ण जगभरावर निर्माण झालेल्या संकटात सर्व देश एकमेकांना मदत करताना दिसून येत आहे.
एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक फैजल एधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पात्रात म्हंटले की, “आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. करोना आणि त्याचा भारतींयांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. या करोना महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणासंदर्भात आम्हाला चिंता आहे. भारतामध्ये सध्या अनेकांना करोनासंदर्भातील संकटाला तोंड द्यावं लागत आहे. सध्याच्या या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो. रुग्णावाहिकांसोबतच त्यासंदर्भातील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो, असे पत्रात म्हंटले आहे.