देश स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आली नव्हती. मात्र देशात प्रथमच एका महिलेला फाशी देण्यात येणार आहे. शबनम असे त्या महिलेचे नाव असून तिला मथुरेतील जाईलमध्ये फाशी देण्यात येणार आहे.
मात्र शबनम कोण? हीच चर्चा होत आहे. शबनम ही मूळची अमरोहाची आहे. मेरठमधील जल्लाद पवन तिला फास देताना खटका ओढेल. शबनमच्या फाशीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी कोणत्याही क्षणी तिच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानला जाते. आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे.
२००८ साली शबनम हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने नातलगातील ७ जणांना कुऱ्हाडीचे घाव घालून संपवले होते. या प्रकरणी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तिने राष्ट्रपतींकडे सुद्धा दया याचिकेचा अर्ज केला होता मात्र राष्ट्रपतींनी तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.