उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसून येत आहेत. भाजपाने सुद्धा आपली सत्ता टिकून राहण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बांके बिहारी मंदिराला भेट दिली. तसेच देशातल्या आणि उत्तर प्रदेशातल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातल्या जनत्याचे असल्याचे मत यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केले. बांके बिहारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी इथल्या लोकांना भाजपाला मत देण्याचे आवाहन केले.
एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार, मथुरेत अमित शाह यांनी घरोघरी जाऊन मते मागण्याच्या प्रत्येकाच्या घरून प्रचाराला सुरूवात केली. त्यानंतर अमित शाह यांनी प्रभावी मतदाता संवाद या कार्यक्रमांतर्गत उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी २०२२ च्या निवडणुकांमध्ये मथुरेतल्या सगळ्या भाजपा उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी मतं मागण्यासाठी आलो आहे. मथुरेचं भव्य दिव्य रुप तिला पुन्हा मिळवून देणं हाच आमचा संकल्प आहे असे विधान त्यांनी यावेळी केलं होत.