मुंबई | भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून मुंबईत 19 व 20 ऑगस्ट या दोन दिवशी जण आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यात विशेष करून मुंबईत क्रोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय कार्यक्रमांना बंदी असून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी कायम आहे.
या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन होत आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्ते एकत्र जमून कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसच मुंबई पोलीसांकडून बजावण्यात आली आहे. जन आशीर्वाद यात्रेसारख्या राजकीय कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग निर्माण होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी यात्रेच्या आयोजकांना नोटीस बजावली आहे.
नियमांचे उल्लंघन होत असल्याने जनतेच्या आरोग्य आणि जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी त्याची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे. यात्रेच्या आयोजनामुळे कायद्याचा भंग होत असल्याने कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे आयोजक असणाऱया पदाधिकाऱयांकर आज कल्याण-डोंबिकलीच्या पोलीस ठाण्यात या पोलिसांनी चार ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. कल्याण-डोंबिकलीत भाजपतर्फे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्काद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ना परवानगी, ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग आणि तुफान गर्दी जमवणाऱया या यात्रेच्या आयोजकांविरोधात मंगळवारी ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज ही यात्रा कल्याणमध्ये निघाली. तेथेही कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत प्रचंड गर्दी जमवण्यात आली.