राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापलेला असताना दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून येत आहे. त्यात 6 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी केली. मात्र यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला होता.
पाटील महाले की, आमीसंभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटलं. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत.
मोर्चा काढायचा रद्द करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांना केला आहे. यावर आता संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस बोलल्यानंतर बघू. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी माझ्याबद्दल बोलतील, त्यावेळी माझे उत्तर असेल. चंद्रकांत पाटील अथवा भाजपमधील अन्य कोणालाही उत्तर देणं मी रास्त समजत नाही, असं संभाजीराजे म्हणाले.