बिहार | जनतेने निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेमध्ये वागताना काही भान बाळगले पाहिजे मात्र दुसरीकडे काही लोकप्रतिनिधी यांच्या वागणुकीतून यांनाच आपण का निवडणून दिले असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. त्यातच थेट पाटणा येथे तेजस एक्स्प्रेसमध्ये आमदार अहोदय थेट अंडरवेयरमध्ये फिरताना आदळून आल्यामुळे प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांनी थेट खडेबोल सुनावले होते.
प्रकरण असे की, बिहारची राजधानी पाटण्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार गोपाल मंडल अंडरवेअरवर फिरत असल्याचे दिसून आले होते. गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर, बनियानवर फिरत होते. गोपाल यांना अशा अवस्थेत पाहून रेल्वेच्या डब्यात असलेल्या काही प्रवाशांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर मंडल यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ झाला. ट्रेनमध्ये तैनात असलेलं आरपीएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी आमदार मंडल यांना समजवण्याचा प्रयत्न केला.
गोपाल मंडल आणि प्रवासी यांच्यात वाद झाला, त्यावेळी तेजस एक्स्प्रेसनं दिलदारनगर रेल्वे स्थानक ओलांडलं होतं. आरपीएफनं घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे. तेजस राजधानी एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या सीट नंबर १३, १४ आणि १५ वरून मंडल प्रवास करत होते. तर जहानाबादमध्ये वास्तव्यास असलेले प्रल्हाद पासवान त्यांच्या कुटुंबासोबत ए-१ कोचच्या सीट नंबर २२, २३ वर होते. दोघांचे तिकीट पाटणा ते नवी दिल्लीपर्यंत होतं.