पंजाब | वरिष्ठांच्या दबावानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता तसेच तात्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची बेहत घेऊन एकाच खळबळ उडवून दिली होती. मात्र आपण भाजपात सामील न होता स्वतःचा पक्ष काढणार असल्याची घोषणा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली होती. त्यातच आता सिंह यांनी पंजाब निवडणुकीच्या मुद्दयावरून मोठी घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. कृषीविषयक कायदे रद्द होताच आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपताच भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
तसेच पंजाबमध्ये साडेतीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणुका कॅप्टन भाजपसोबत लढवणार असल्याचेही निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याची समस्या समजून घेत कृषी कायदे रद्द केले. एवढेच नाही, तर ‘मी हा मुद्दा सातत्याने उचलला आणि सरकारला भेटत राहिलो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.