मुंबई | भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. या एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यापूर्वी नितेश राणे शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. तसेचच महाविकास आघाडी सरकरवे सुद्धा जोडणे प्रहार केला होता.
राणे म्हणाले की, कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा टोला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला.
राज्य सरकारला सर्व गर्दी हिंदू सणांवर दिसते. दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी दिसते. यांचे नातेवाईक गर्दी करतात ते दिसत नाहीत. नितीन राऊतांनी सरकारमध्ये बसलेल्या कोरोना स्प्रेडरकडे पाहावे. ते मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करून गर्दी करत आहेत. त्यांना पहिली थोडी ताकीद द्या. मग गणेशोत्सवावर विघ्न आणा, असा हल्लाही त्यांनी चढवला. या सरकारला मोहरमची गर्दी चालते, सभांची गर्दी चालते पण गणेशोत्सवात लोक निघाले की कोरोना निघतो. हे सरकार विघ्न सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.