एकीकडे राज्यात महामारीचे संकट गडद होत असताना, मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत तौत्के चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने प्रकार दिसून आले होते, त्यात अनेक झाडं उन्मळून पडली आहेत, राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कित्येक घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे, तर चक्रीवादळाने राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबईसोबतच अनेक उपनगरांमध्ये अद्यापही मुसळधार पावसानं थैमान घातलं असून, दोन दिवसांपासून इथे पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला असून, वरळीतील एका भागाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.” असा खोचक टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे??? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली??? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.