मुंबई | मुंबईचे पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या होत्या. तर दुसरीकडे सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानंदेखील आपल्याकडे लसींचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, यासंदर्भात पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सध्या शाळा सुरू करण्याचीही गरज वाटते आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलं घरी आहेत. माझी अनेकदा पालकांशी चर्चाही झाली आहे. आपल्याला १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असून यासाठी लसींच्या दोस डोसमधील कालावधी कमी करणं आवश्यक आहे असं मत यांनी पत्रात मांडलं आहे.
वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या फ्रंट लाईन आणि हेल्थकेअर वर्कर्सना त्यांच्या इच्छेनुसार तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोना लस घेण्यासाठी असलेली वयाची मर्यादा १५ वर्षांपर्यंत करावी. त्यामुळे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लस मिळू शकेल, असं ठाकरेंनी पत्रात नमूद केलंय.