मुंबई | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडी कार्यालयात माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाची चौकशी करून ताब्यात घेतले होते. तसेच ईडीने सुद्धा खडसे यांची चौकशी केली होती. यावर जेव्हा विरोधी पक्षनेते यांना विहरण्यात आले तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. खडसेंनी भाजपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. तसेच मी पक्ष सोडल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप सुद्धा त्यांनी केला होता.
शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडवणीस यांना माध्यमांनी खडसे यांच्यावर ईडी प्रकरणी झालेल्या कारवाई बद्दल विचारले. खडसे प्रकरणात मी काय बोलणार, पुरावे असतील म्हणून ईडी करतं असेल, मी ईडीचा प्रवक्ता नाही, असं फडणवीस म्हणाले. खडसेंच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली. भाजपमधून बाहेर पडल्यास काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचं आहे. हा भाजपचा एक प्रकारचा टॅक्टिक्सचा भाग असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.