मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध भागांतील विकास कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्याहाती गाडीचं स्टेअरिंग होतं तर त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. या संदर्भात संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे आणि पवारांना एकत्र पाहून भाजपच्या पोटात दुखतं असंही राऊत म्हणाले.
मविआचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती संजय राऊत म्हणाले, उत्तम आहे. हिच तर भाजपची कळ आहे, पोटात कळ येते ना? कळ वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यांना कळ त्यामुळेच येत आहे. दबावाचं राजकरण करुन, धमक्यांचं राजकारण करुन सुद्धा महाविकास आघाडी सरकारला तडा जात नाही आणि तो कधीच जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे आणि तो राहील.
तसेच भाजपने ४० पैकी ४२ जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांनाच वाटतं की बहुमत आपल्याला मिळणार आहे. आत्मविश्वास चांगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही झाल्या, तेथे पाहिलं काय झालं ते. देवेंद्र फडणवीस बोलतात ते बरोबर बोलतात, मी तर बोलतो 40 पैकी 42 जागा भाजप जिंकेल असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.