पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचं उदघाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच याचवेळी पुणे महानगरपालिकेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळा ही पडणारा आहे.
सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प आहे. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकाचे उद्घाटन व पाहणी करतील आणि तेथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोचा प्रवास करतील.
दुपारी 12 वाजता पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. बालेवाडी, पुणे येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यानंतर, दुपारी 1.45 वाजता पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सुरुवात करतील.