मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांची यांची कारागृहातून सुटका झाली. तर याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमा सुरु झालेली पाहायला मिळाली होती.
राणा दाम्पत्य मागील 12 दिवसांपासून कारागृहात होतं. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना प्रकृती खालावल्याने लिलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. यातच शुक्रवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची लीलावती रुग्णालयात जावून भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
त्यांनी ट्विट केले आहे की,’खासदार नवनीत राणा यांची आज लीलावती इस्पितळात भेट घेतली एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकार ने..’ असं म्हणत वाघ यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे.