सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या सध्य स्थितीतवर भाष्य करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना स्वरा भास्कर अनेकदा दिसून आली आहे. आता पुन्हा एकदा स्वराने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. तिच्या ट्विटमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला होते. किशोर कुमार यांचे गाजलेले गाणे ”मेरे मेहबुब कयामात होगी” अशी कॅप्शन देत देशांतील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर भाष्य करत केंद्रावर टीका केली होती.
स्वराने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या विश्वासाने आम्ही निवडून दिले आहे ते ही दोन वेळा. त्यांना भारताच्या जनतेकडून हा खास संदेश म्हणत तिने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. मात्र तिच्या ट्विटवर आता दिग्दर्शक अशोक पंडित यांनी स्वरावर संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. अशा परिस्थितीतही स्वरा भास्कर देशात विष पसरवण्याचे काम करत आहे असा आरोप त्यांनी स्वरावर केला आहे.
स्वरा नाही बेस्वरा म्हणत त्यांनी स्वरावर तीव्र टीका केली आहे. बेस्वरा तू तर तुकडे तुकडे गँगची सदस्य आहेस, ज्यांनी देशात फक्त विष पसरवण्याचे काम केले. जे काम करत आहेत त्यांना पुरावा देण्याची गरज नाही, जरा घराबाहेर पड आणि लोकांची मदत करत, देशात थोडं फार प्रमाणात पसरणारे विषही कमी होईल.अशोक पंडित यांच्या या ट्विटला अनेक नेटक-यांनी लाईक्स करत रिट्विटही केले आहे. आता या टीकेला स्वरा औ उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.