राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये विराट सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या सभेला विक्रमी गर्दी जमल्याचा दावा शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, ही गर्दी पैसे देऊन जमवल्याचा आरोप केला जातोय. मनसे नेते सतीश नारकर यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा फोटो ट्विट करून हा आरोप केला आहे.
बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची सभा सुरु होण्यापूर्वी सतीश नारकर यांनी चंद्रकांत जाहीर सभेसाठी पैसे वाटप करत असल्याचा फोटो शेअर केला होते तसेच ते लिहितात की आज संध्याकाळच्या सभेसाठी पैसे देऊन माणसं जमवताना चंद्रकांत खैरे !!! हे तेच खैरे आहेत जे राजसाहेबांनच्या सभेला पैसे देऊन माणसं आणतात म्हणुन बोंबलत होते, आता कळलं काविळ झालेल्या माणसाला सगळंच पिवळ दिसत ते’ असे ट्विट केले आहे.
अमेय खोपकर आणि राजू पाटील यांनी ट्विट केल्यानंतर आज सकाळी भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट कंल आहे. विराट सभेचा फॉर्म्युला असं कॅप्शन टाकत त्यांनी चंद्रकांत खैरेंचा फोटो पोस्ट केला आहे. आता या टीकेला शिवसेना काय प्रतिउत्तर करते हे पाहावे लागणार आहे.