पुणे प्रतिनिधी | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यावर घोटाळ्याचा आरोप लावून एकच खळबळ उडून दिली होती. त्यातच त्यांचा कोल्हापूर दौरा सुद्धा चांगलाच गाजला होता. त्यातच पुन्हा एकदा सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप लावला आहे.
मुश्रीफ यांनी निती आयोगाकडून ग्रामपंचायतींसाठी थेट येणाऱ्या दरवर्षीचा १५०० कोटी रूपयांचाच्या निधीचे कॉन्ट्रॅक्ट परस्पर स्वत:च्या जावायला दिले आहे. दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या नावाने बोगसपणे कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. मुरगुड पोलीस ठाण्यातील गुन्हा पुणे परिक्षेत्राच्या लाचलुचपत विभागात वर्ग करण्याची ठाकरे-पवारांची चालाखी चालणार नाही. मुश्रीफ परिवारावर कोल्हापुरातील मुरगुड ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तेथेच कारवाई करा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुणे येथे केली.
पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेऊन यासंदर्भातील आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे सादर केल्याचे किरीट सोमय्या यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा चलाखी करत आहेत. ते चालणार नाही असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.