मुंबई : बृहमुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला अधचणीत आणण्यासाठी आणि सत्तेतून खाली खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरवात केली आहे. त्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने कटकारस्थानं सुरू आहेत, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
“मुंबई भाजप सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेता शिवसेनेनं निवडणुकीपासून पळवाट काढायची तयारी सुरू केली आहे. कोरोनाचं कारण देऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे”, असा खळबळजनक आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे. याशिवाय, कोरोनाचे सर्व नियम पाळून निवडणूक आयोगानं ठरवलं आणि निवडणूक वेळेतच घेतली तरी भाजप पूर्ण तयार आहे हे सांगताना शेलार यांनी बॉलिवूड स्टाइल डायलॉगची आठवण करुन देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“सामनामध्ये दररोज डायलॉगबाजी केली जाते. आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है”, असं शेलार म्हणाले आहेत. आता आमदार आशिष शेलार यकन्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.