एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे. शासकीय कामात अडथळा अणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी काल कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले होते. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरण असे की, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शहरातील अनेक दुकाने सील करण्यात आली आहेत. या सील केलेल्या दुकानांना मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांनासुद्धा मोठा दंड आकारला गेला आहे. हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही. दंड भरणे शक्य नसल्यामुळे या दुकानदारांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीयेत. याच कारणामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयात गेले होते.
यावेळी जलील यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यावर व्यापाऱ्यांची दुकाने कमीत कमी दंडामध्ये सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी जलील यांनी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली. त्या मागणीलासुद्धा उलटसुलट उत्तर मिळाली. याच कारणामुळे जलील अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.